आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tram By Underground Power Supply Kickstarted In Dubai

जमिनीतील वीजतारांद्वारे दुबईमध्ये ट्रॅमसेवा सुरू, जगातील पहिले ट्रॅम नेटवर्क असल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई । खाडी देशांमध्ये प्रथमच दुबई शहरात ट्रॅम सेवा सुरू करण्यात आली आहे. या पहिल्या ट्रॅमच्या मार्गावर रहिवासी तसेच औद्योगिक परिसरातील मुख्य ११ स्टेशन्स असून हा मार्ग १०.६ किलोमीटर लांबीचा आहे.

जमिनीवरील इलेक्ट्रिक वायर्सद्वारे संपूर्ण ट्रॅमच्या मार्गावर वीजपुरवठा करणारे दुबई हे युरोपबाहेरील पहिले शहर असल्याचा दावा दुबई रस्ते आणि परिवहन महामंडळातर्फे करण्यात आला आहे.

ट्रॅमच्या या मार्गावर कुठेही तरंगत्या तारांद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला नाही. दुबईचे युवराज शेख हमदन बिन मोहंमद बिन रशीद अल मखतूम यांच्या हस्ते मंगळवारी या मार्गाचे उद््घाटन करण्यात आले. बुधवारपासून हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

महिला-पुरुषांसाठी वेगळी आसनव्यवस्था
प्रत्येक ट्रॅम ४४ मीटर लांबीचा असून त्या ४०५ आसनक्षमता आहे. याद्वारे दररोज २७ हजार नागरिक प्रवास करतील, असा अंदाज आहे. दुबईतील या ट्रॅममध्ये महिला व मुलांसाठी स्वतंत्र केबिन अाहे. तसेच गोल्ड क्लासच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र केबिन आहे. अपघात टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रॅमच्या मार्गावर १५० पोलिस अधिकारी आणि ६४ स्पीड कॅमेरे लावण्यात आले आहेत.