आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Taiwan Plane Crashes Into River After Take off, Killing 22

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : तैवान विमान दुर्घटनेत 31 प्रवासी ठार 15 जणांचे प्राण वाचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैपेई - तैवानमध्ये ट्रान्सएशिया विमान कंपनीचे प्रवासी विमान नदीत कोसळून झालेल्या अपघातात किमान 31 प्रवासी ठार झाले असून 12 प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. सुदैवाने 15 जण सुरक्षित आहेत. तैवानमधील हा सात महिन्यांतील दुसरा विमान अपघात आहे.

विमान अपघाताचे दृश्य एका व्हिडिओमध्ये चित्रित झाले असून त्यातील फुटेजमध्ये विमान क्रमांक ७२-६०० रस्त्याला धडकले आणि त्यानंतर नदीत कोसळले. विमानाचे एक पाते टॅक्सीवर आदळल्याचे मला दिसले. महाकाय विमान माझ्या अगदी जवळ होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने टीव्हीबीएस न्यूजला सांगितले. विमान अवशेषातून १५ जणांना वाचवण्यात आले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. १२ प्रवाशांचा अद्याप ठावठिकाणा नाही. बहुतांश प्रवासी चिनी पर्यटक होते. ट्रान्सएशिया एअरवेज कंपनीचा सात महिन्यांतील हा दुसरा अपघात आहे.

जुलैमधील अपघातात ४८ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर तैपेईतील सोंगशान विमानतळावर उड्डाणानंतर सकाळी ११ वाजता विमान कोसळले. विमानात चालक दल सदस्यासह ५८ प्रवासी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर चेन यांच्यासह सहा अधिकार्‍यांनी अपघाताबद्दल माफी मागितली. शोधमोहिमेत दुपारपर्यंत १३ मृतदेह सापडले. बेपत्ता प्रवासी विमानाच्या मुख्य भागात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, तैपेइतील नदीत कोसळलेल्या विमानाची छायाचित्रे....