आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारदर्शक मोबाइलमध्‍ये ‘स्विचेबल ग्लास’ तंत्रज्ञानाचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - तैवानच्या पॉलिट्रॉन टेक्नॉलॉजीस कंपनीने पारदर्शक मोबाइल फोन तयार केला असून या वर्षअखेरीस तो बाजारातही उपलब्ध होणार आहे. मोबाइल जगतातील ही एक क्रांतिकारी घटना आहे. कंपनीने या मोबाइल फोनचे मार्केटिंग करण्यास सुरुवातही केली आहे. या मल्टिटच प्रोटोटाइप फोनमध्ये ‘स्विचेबल ग्लास’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मोबाइल फोनमध्ये प्रतिमा प्रदर्शित करण्यासाठी कंडक्टिव्ह लाइट इमिटिंग डायोडचा वापर करण्यात आला आहे.

जेव्हा हा मोबाइल फोन स्विच ऑफ असतो तेव्हा दुधाळ रंगाच्या पारदर्शक पट्टीसारखा दिसतो आणि स्विच ऑन केल्यानंतर त्याच्यावर आयकॉन, टेक्स्ट व इमेजेस व अन्य सामग्री दिसू लागते. या फोनमध्ये विद्युत प्रवाहाचेही पारदर्शक वायरमधूनच वहन करण्यात आले आहे. ‘माझ्यावर विश्वास ठेवा, 2013 अखेरपर्यंत हा मोबाइल फोन तुमच्या हातात येईल,’ असे सॅम यू यांनी म्हटले आहे. या प्रोटोटाइप फोनमध्ये कोणती ऑ परेटिंग सिस्टिम किंवा सॉफ्टवेअर असणार हे स्पष्ट झालेले नाही.

काही सुटे भाग अपारदर्शकच
या मोबाइल फोनमध्ये मेमरी कार्ड आणि सीमकार्डसारखे पारदर्शक नसलेले काही पार्ट्स अद्यापही आहेत. मायक्रोफोन, बॅटरी आणि कॅमेराही ही उपकरणेही पारदर्शक नाहीत. जेव्हा या मॉडेलची निर्मिती होईल तेव्हा एका गडदरंगाच्या काचेच्या आच्छादनाने ते झाकून टाकले जाणार आहेत. लक्षात येऊ नये म्हणून या मोबाइलसाठी छोटी लिथियम बॅटरी तयार करण्यात येणार आहे. या मोबाइलला फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही बाजूंनी मल्टिटच डिस्प्ले असणार आहे, असे पॉलिटॉनचे महाव्यवस्थापक सॅम यू यांनी म्हटले आहे.

मनगटी घड्याळामध्येही एका जपानी कंपनीने मनगटी घड्याळामध्ये ट्रान्सपरन्ट लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मात्र, छोट्या फ्रेममध्ये हार्डवेअर टाकताना कंपनीला अडचणी आल्या आहेत. मनगटी घड्याळे किंवा वापराच्या अन्य तत्सम उत्पादनांमध्ये एलसीडीचा वापर हे एक आव्हान आहे. तुम्हाला अन्यत्र कुठेतरी बॅटरी लपवावी लागते. एलसीडी पॅनलमागे दडवली जाते, असे टोकियोफ्लशचे व्यवस्थापक पॉल कूपर यांनी म्हटले आहे.
...तर पसंतीस उतरणार नाही
प्रोटोटाइपमध्ये स्मार्टफोनपेक्षा वेगळी कार्यप्रणाली नसल्यामुळे हा पारदर्शक फोन ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी होतो का, हे पाहावे लागेल. त्याची डिस्प्ले क्वालिटी चांगली नसेल तर हा फोन ग्राहकांना आकर्षित करू शकणार नाही. अ‍ॅव्ही ग्रीनगार्ट, संशोधन संचालक, करंट अ‍ॅनालिसिस