आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या विमानातील प्रवासी समुद्रात पडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - आपल्या छोट्या विमानातील एक प्रवासी मियामीच्या समुद्रात पडल्याचे एका अमेरिकन वैमानिकाने म्हटले आहे. गुरुवारी दुपारी या वैमानिकाने फेडरल उड्डयन प्रशासनाला (एफएए) या संदर्भात फोन करून कळवले असल्याचे प्रशासनाच्या प्रवक्त्या कॅथलिन बर्गेन यांना सांगितले. हे विमान 2000 फूट उंचीवरून उडत असताना एफएएला हा कॉल आल्याचे त्यांनी सांगितले.
तामियामीच्या विमानतळावर हे विमान सुखरूप उतरले. आता तटरक्षक दल, मियानी अग्निशमन दलाचे हवाई आणि जल आपत्ती निवारण दलाचे जवान त्या व्यक्तीचा समुद्रात शोध घेत आहेत. हे विमान नेमके कुठून येत होते आणि त्यात किती प्रवासी होते, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. उड्डाण नियंत्रण कक्षाला या वैमानिकाने कॉल केला. त्याचे ध्वनिमुद्रण लाइव्हअ‍ॅक्ट डॉट नेट या वेबसाइटवर टाकण्यात आले आहे. त्यात तो म्हणतो की, ‘मेडे मेडे मेडे, माझे दार अर्धवट उघडे होते आणि एक प्रवासी खाली कोसळला. मी तामियामीपासून सहा मैलांवर (9 किलोमीटर) आहे.’ त्याच्या कॉलवर नियंत्रण कक्षातील अधिकारी त्याला म्हणाला , ‘तुमच्या विमानातून प्रवासी खाली पडला, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?’ वैमानिक म्हणाला, ‘हो अगदी बरोबर आहे सर. त्याने पाठीमागचे दार उघडले आणि तो विमानातून खाली पडला.’
तटरक्षक दल आणि अग्निशमन दलाचे अधिकारी मात्र वैमानिकाच्या आपत्कालिक कॉलवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांनी विमानतळावर हेर पाठवून चौकशी सुरू केली आहे.