आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: हिटलरच्‍या क्रूर लष्कराने 8.70 लाख ज्‍युंचा अमानुषपणे केला होता नरसंहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेबलिंका- या गावात छळ छावन्‍यांमधून ज्‍यूंची हिटलरच्‍या सैन्‍याने केलेली कत्‍तल जगाला सुन्‍न करणारी आहे. ट्रेबलिंका ये‍थे आजही स्‍मशान शांतता पाहायला मिळते. इथल्‍या मातीतून आजही रक्‍ताचा वास येत असल्‍याचा भास होतो. दुस-या महायुध्‍दाच्‍या काळामध्‍ये क्रूरकर्मा हिटलरने या ठिकाणी 'ज्यु' समाजातील 8.70 लाख लोकांची अमानुष पध्‍दतीने हत्‍या केली होती.
पोलंडची राजधानी वारसॉपासून 80 किलो मीटरवर असलेल्‍या ट्रेबलिंका या खेडेगावत ऑपरेशन 'रेनहार्ड' नावाखाली ज्‍यू लोकांचा झळ केला जात असे. रेनहार्ड मोहीमेसाठी नाझी सैन्‍यांनी तीन छावण्‍या उभारल्‍या होत्‍या, त्‍यापैकीच ट्रेबलिंका एक होती. या छावणीच्‍या जवळच नाझींचा गुप्‍त कँप बनवण्‍यात आला होता. या कँपच्‍या माध्‍यमातून जुलै 1942 ते ऑक्‍टोबर 1943 च्‍या कालावधीमध्‍ये 'ऑपरेशन रेनहार्ड' राबवण्‍यात आले होते.
हिटलरच्‍या छळ छावण्‍यामध्‍ये नाझींच्‍या अमानुष कृत्‍याचे बळी ठरलेल्‍यांना आदरांजली वाहण्‍यासाठी इंटरनॅशनल होलोकॉस्‍ट रिमेम्‍बरन्‍स डे' आयोजीत केला जात आहे.
दुस-या महायुध्‍दात ज्‍यु लोकांवर झालेल्‍या अत्‍याचारीची माहिती वाचा पुढील स्‍लाईडवर......