(एलमेती येथे बनवण्यात आलेले ट्री हाउस)
एलमेती - कजाकिस्तानमधील एलमोती शहरात फॅशन अँड डिझाइन हाउस मैसाओच्या डिझायनर्सने तीन मजली ट्री हाउस तयार केले आहे. जंगलाच्या अगदी मधोमध बनवण्यात आलेले हे ट्री हाउस पुर्णपणे काचेचे आहे. हे घर एका 40 फुट उंच झाडाशेजारी बनवण्यात आले आहे. या घरात किचन, लिव्हिंग रूम आणि बाथरूम देखील तयार करण्यात आले आहेत.
एका 38 वर्षीय व्यवसायीकासाठी या घराची निर्मिती गेल्या वर्षी करण्यात आली आहे. यासाठी 240,000 पाउंड (म्हणजे 2 कोटी 46 लाख रुपये) एवढा खर्च करण्यात आला. धावपळीच्या जीवनात थोडासा आराम मिळावा आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे सुख मिळावे म्हणून या घराची निर्मिती करण्यात आल्याचे आर्किटेक्टने सांगितले आहे.
पुढील स्लाइड्वर क्लिककरून पाहा या अनोख्या ट्री हाउसचे आणखी फोटो...