आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझामध्ये आहेत इजिप्तशी जोडणारी अनेक भुयारे, येथून होतो सगळा पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रफाह - गाझापट्टी्ध्ये एक अंडरग्राऊंड अर्थव्यवस्थाही आहे. भुयारांद्वारे चालणा-या तस्करीचे एक मोठे नेटवर्क याठिकाणी आहे. हे भुयार गाझापासून इजिप्तपर्यंत जातात. या दोन देशांदरम्यान अन्न, औषधी, उत्पादन साहित्य, हत्यार आणि इतर सामानाच्या वाहतुकीसाठी यचा वापर केला जातो. सध्या इस्रायलकडून होणा-या हल्ल्यामुळे या भुयारांचेही मोठे नुकसान होत आहे.

इस्राइलने नेहमीच या भुयारांना लक्ष्य केले आहे. या भुयारांद्वारे इजिप्तचमधून हत्यारांच्या तस्करीचे काम चालते, असा इस्राइलला संशय आहे. गेल्या काही वर्षांत इस्राइलने गाझामधील अशी अनेक भुयारे नष्ट केली आहेत. पण तरीही गाझामध्ये नव्याने भुयारे तयार केली जातात.
या भुयारांमधून तेलाची आयातही होते. गाझातील एकमेव वीज संयंत्रासाठी आयात करून आणलेल्या तेलावरच अवलंबून रहावे लागते. 2013 मध्ये जेव्हा इजिप्तने शेकडो भुयाने नष्ट केली होती, त्यावेळी तेलाच्या कमतरतेमुळे हे एकमेव संयंत्र बंद पडले होते.
इजिप्तमध्ये अनेकदा लादली बंदी
इजिप्त आणि गाझापट्टीला जोडणा-या या नेटवर्कला अनेकदा बंद करण्यात आले. 2009 मध्ये येथून होणारी वाहतूक रोकण्यासाठी अंडरग्राऊंड बॅरियर लावण्यात आले. पण 2011 मध्ये इजिप्तने ही बंदी मागे घेतली. त्यानंतर पॅलेस्टाईनची सीमा ओलांडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुन्हा 2013-2014 मध्ये इजिप्तच्या सैन्याने सुमारे 1,200 भुयारे नष्ट केली होती.
प्रवासी वाहतुकीसाठी होते तिकिट
या भुयारांमधून लोकांना प्रवासाचीही परवानगी होती. त्यासाठी एक तिकिट दिले जात होते. या तिकिटाचा दर 30 ते 300 डॉलर एवढा असायचा. ही तिकिटे वेगवेगळ्या किमतीला विविध ठिकाणी उपलब्ध असायची. 2012 मध्ये रमजानच्या काळात यातून प्रवास हा नेहमीचाच होता.
पुढील स्लाइड्वर पाहा गाझाला इजिप्तची जोणारे हे भुयार आणि कशी व्हायची आयात.
(फोटो - गाझा आणि इजिप्तला जोडणारे भुयार)
पुढील स्लाइड्सवर पाहा भुयाराचे आणखी काही फोटो...