आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkeys President Moves Into Worlds Biggest Palace Costing

PIX - दम आहे तर तोडून दाखवा इमारत, 3763 कोटी रुपयांच्या महालात राहाणार्‍या राष्ट्रपतींनी दिले चॅलेंज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: स्वतःचे महाल व्हाइट पॅलेसमध्ये तुर्कस्तानचे राष्ट्रपती एरडोगन

अंकारा
- तुर्कस्तानचे राष्ट्रपती जगातील सर्वात मोठ्या महालात राहाण्यास गेले आहेत. या महालाला बनवण्यासाठी जवळपास 3763.2 कोटी रुपये खर्च आला आहे. 11 वर्षांपर्यंत तुर्कस्तानचे पंतप्रधान असलेले रेसेप तैयिप एरडोगन 'व्हाइट पॅलेस' नावाच्या महालात राहात होते. हा महल तुर्कस्तानची राजधानी अंकारामधील जंगलाच्या जमीनीवर आहे. या जमिनीवर बांधकाम करण्यास कोर्टाने मनाई केली होती. तसेच या अमाप खर्चासाठी एरडोगन यांच्यावर बरीच टिका झाली आहे. मात्र बेजबाबदार एरडोगन म्हणाले की, "या महालाची निर्मिती कोणी थांबवू शकत नाही. जर कोणामध्ये (अपक्षांमध्ये) दम असेल तर त्यांनी समोर यावे आणि हे महाल पाडून दाखवावे."
या जंगलाच्या जमीनीवर कोणतेही बांधकाम करणे बेकायदेशीर असतानाही एरडोगन यांनी येथे भव्य महाल उभारला. या महालामध्ये 1,000 खोल्या आहेत. तर या महालाची फ्लोअर एरीया 31 लाख वर्ग फुट एवढा आहे.
व्हाईट पॅलेस फ्रान्सच्या सम्राट लुई चौदावे यांचा महाल 'वर्सेलिस' आणि 'ब्रिटन'चे शाही परिवारचा महाल बकिंघम पॅलेसपेक्षा चार पटीने मोठा आहे. मात्र यावर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रपती बनलेले एरडोगनच्या शाही खर्चामुळे त्यांना बर्‍याच टीकेला सामोरे जावे लागत आहे. तुर्कस्तानची रिपब्लिकन पीपल्स पार्टीशी संबंधीत अपक्ष नेते केमल किलिकडारोग्लू यांच्या मते "या सुलतानाने एका अशा देशामध्ये हे महाल बांधले आहे, जेथे 30 लाख लोक बेरोजगार आहेत. तसेच शेकडो झाडे तोडून त्यांनी त्यातून स्वतःसाठी महाल बांधला आहे." एरडोगनचा शाही खर्च केवळ महालापर्यंतच मर्यादित नाही, तर त्यांनी स्वतःसाठी 1127 कोटी रुपये खर्च करून एअरबसचे स्पेशल जेट विमान बनवले आहे.
व्हाइट पॅलेस महलाची इतर वैशिष्ट्ये
- बाथरूममध्ये सिल्क वॉलपेपर लावण्या आले आहेत.
- महलाच्या चारीही बाजूस झाडे लावण्यात आली आहेत.
- महलाच्या आत चीनच्या अत्याधुनिक रेल्वेस्टेशनप्रमाणे निर्मिती करण्यात आली आहे.
जगातील सर्वात प्रसिध्द भवन आणि त्यांचा फ्लोअर एरिया
बकिंघम पॅलेस (इंग्लंड)- 7.70 लाख वर्ग फुट
वर्सेलिस (फ्रांस) - 7.21 लाख वर्ग फुट
व्हाइट हाउस (अमेरिका) - 54876 वर्ग फुट
राष्ट्रपति भवन (भारत) - 2 लाख वर्ग फुट

पुढील स्लाईडमध्ये पाहा या महालाचे फोटो...