आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkish Border Bomb Blast That Killed At Least 46

तुर्कीत बॉम्बस्फोट, 46 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्तंबुल - तुर्कीतील एका शहरात झालेल्या कार बॉम्बस्फोटात 46 जण ठार, तर शंभरावर लोक जखमी झाले आहेत. दोन स्फोटकांनी भरलेल्या कारच्या साहाय्याने हा स्फोट घडवण्यात आला. स्फोट प्रकरणात तुर्कीच्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

रियाहनली शहरात शनिवारी हा स्फोट झाला असून रियाहनली शहर सिरिया सीमेजवळ वसलेले आहे. 50 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रियाहनली शहरात किमान 60,000 लोकसंख्या आहे. स्फोटानंतर शहरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. जगभरातून सिरियातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेले स्फोट योगायोग समजला जाऊ नये, असे तुर्कीचे परराष्ट्र मंत्री अहमद डावटोगु यांनी म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्फोटात 17 जण ठार झाले होते. स्फोटानंतर काही इमारती कोसळल्या आहेत.