आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाप्रमाणे हा देशही जगाकरिता एक रहस्यच बनलाय..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: तुर्कमेणिस्तानच्या माजी राष्‍ट्रपतींचे सुवर्ण पुतळा

कायम बातम्यात झळकणा-या उत्तर कोरिया जगासाठी एक गूढ बनला आहे. पण आशियात आणखी एक देश कोरियाच्याबरोबरी करत आहे. तो देश म्हणजे तुर्कमेणिस्तान. स्वातंत्र झाल्यापासून हा देश पूर्णपणे वेगळा पडला आहे. तुर्कमेणिस्तान 1991 साली सोव्हिएत संघातून वेगळा झाला. तेव्हापासून सपरमुरत नियाझोव यांनी या देशावर राज्य केले. स्टॅलिनच्या शासन कार्यकाळात नियाझोवने अल्पावधीत स्थानिक कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली. त्यांनी गोर्बाचेव्ह यांना पदावरुन हटवण्‍यासाठी जोरदार मोहिम सुरु केली होती. या बदल्यात सुप्रीम सोव्हिएतने बक्षीस म्हणून नियाझोव यांना स्वातंत्र देशाचे राष्‍ट्रपतीपद देऊन टाकले. वास्तवात राष्‍ट्रपती निवडणुकीत नियाझोव एकमेव उमेदवार होते.

1994 साली देशात 99.9 टक्के लोकांनी नियाझोव यांचा कार्यकाल 10 वर्षांचा व्हावा यासाठी मतदान केले होते. 2006 रोजी नियाझोव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नंतर 2007 साली गुरबंगुली बर्दिमुहंमेदो हे नवे राष्‍ट्रपती झाले. तुर्कमेणिस्तान हा उत्तर कोरियाप्रमाणे जगापासून खूप अलिप्त आहे. डोर टू हेल यामुळे माध्‍यम आणि पर्यटकांचे लक्ष या देशाकडे वेधले आहे.

पुढे पाहा, तुर्कमेणिस्तान आणि त्या देशाच्या पहिल्या शासकाचे काही छायाचित्रे....