आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कस्तानातील गुहांत वसलेले हे आहे भूमिगत शहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्कस्तानात सेंट्रल अ‍ॅनातोलियाच्या एका केप्पादोसिया नावाचे शहर असून येथील पाषाणांचा विशिष्ट आकार आणि रंगामुळे हा भाग चंद्रावरील भूपृष्ठाप्रमाणे दिसतो. इस्तंबूलपासून 730 किमी दूर अंतरावर असलेल्या या शहराला भूमिगत शहर म्हटले जाते. बाहेरून हा परिसर एका मोठ्या शहरासारखा दिसतो, परंतु येथील गुहेत चर्च, घरे, रुग्णालये आणि शाळा वसलेल्या आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने या शहराला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. उंच पर्वत, खोल द-या आणि वळणदार रस्ते असल्याने येथे पोहोचणे थोडे अवघड जाते, परंतु पर्यटकांच्या दृष्टीने येथे खास वाहनांच्या सोयी उपलब्ध आहेत. याशिवाय येथील ‘हॉट एअर बलून’चा रोमांचकारी अनुभव घेणारे लोक येथे आवर्जुन येतात. हवामान चांगले असल्यास येथे ‘हॉट एअर बलून’ची उड्डाणे सुरू होतात. केप्पादोसिया आणि आजूबाजूचा परिसर जेव्हा माणसांनी घरे बनवण्यास सुरुवात केली होती, त्याकाळातील आहे. प्रारंभी डोंगरे कापून त्यात घरे बनवण्याची सुरुवात झाली होती. वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून घरे बांधण्याची कल्पना सुचली. तरीसुद्धा हे इतर शहरांच्या तुलनेत कोणत्याही दृष्टीने मागास नाही. याच कारणामुळे पर्यटक या शहराचे सौंदर्य जवळून पाहू शकतात.

rcappadociaturkey.net