केपटाऊन - दक्षिण आफ्रिका प्रसारण महामंडळाचे कार्यकारी प्रमुख हलाउदी मोत्सोएनेंग यांना भेटीदाखल एक युवती, एक गाय आणि वासरू देण्यात आले आहे. एका स्थानिक पारंपरिक कबिल्याच्या नेत्यांनी ही भेट दिली आहे. महिला संघटनांनी मात्र या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला असून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही युवती मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाची विद्यार्थिनी आहे.
सोवेतान नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्राने गेल्या आठवड्यात हे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानुसार, लिंपोपो प्रांताच्या थोहोयांदोऊत वेंदा कबिल्याच्या प्रमुखाने 10 मुलींना एका रांगेत उभे केले आणि मोत्सोएनेंग यांना त्यापैकी एकीची निवड करण्यास सांगितले. मोत्सोएनेंग यांनी 22 वर्षीय युवतीची निवड केली.