आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरदर्शनची नक्कल: सावत्र बहिणीची गुद्दे मारून हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू ओर्लिन्स - टीव्हीवरील रेस्लिंग पाहून अमेरिकेतील न्यू ओर्लिस शहरात एका 13 वर्षीय मुलावर त्याच्या पाचवर्षीय सावत्रबहिणीचा अतिरिक्त रेस्लिंग करवून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.


या मुलाने सावत्र बहिणीबरोबर ‘डब्ल्यूूडब्ल्यूएफ’ स्टाइलने रेस्लिंग केली, असे जेफरसन पॅरिश शेरीफच्या कार्यालयातील कर्नल जॉन फोर्टुनाटो यांनी सांगितले. या रेस्लिंगच्या प्रकाराप्रमाणे त्या मुलाने सावत्रबहिणीला वारंवार बेडवर आपटले, पोटात गुद्दे मारले, तिच्या शरीरावर उड्या मारल्या आणि कोपराने तिच्यावर जोरदार प्रहार केले. त्यामुळे मुलीच्या शरीरात अंतर्गत रक्तप्रवाह झाला. तिच्या फासळ्या तुटल्या आणि यकृत फुटल्याने मुलीचा मृत्यू ओढवला, असे तपासात आढळून आले आहे. या प्रकारानंतर डब्ल्यूडब्ल्यूईने खेद व्यक्त केला आहे. मात्र या मृत्यूस आपणास जबाबदार धरण्यात येऊ नये, असा इशारा दिला आहे. तज्ज्ञ हेर मॅट वास्केझ याने या प्रकरणाचा तपास केला. टीव्हीवरील रेस्लिंगचे प्रकार खोटे आहेत, हे मला माहीत होते, असे तो म्हणाला. मात्र त्याबाबत बोलण्यात त्याला खूपच रस होता, असे मॅट यांनी सांगितले.