आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या पहिल्या ऐतिहासिक सिग्नलची ‘फिफ्टी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जगभरात आज कोणत्या गोष्टीचा दबदबा असेल तर तो माहितीचा. माहितीच्या देवाण घेवाणीचे जगभर जाळे पसरले आहे. थ्रीजी, फोरजी सेवा सुरू झाल्या आहेत. माहितीच्या क्रांतीचा हा पुढचा टप्पा आहे.
गुरुवारी दूरचित्रवाणी सेवेची सुरुवात होऊन 50 वर्षे पूर्ण झाली. 12 जुलै 1960 रोजी अटलांटिक(ट्रान्स अटलांटिक) मेनच्या(न्यू इंग्लंड, अमेरिका) एंडेव्हर अर्थ स्टेशनहून फ्रान्सच्या ब्रिटनी येथील प्लॉमे-बोडो टेलीकॉम सेंटरला पहिला दूरचित्रवाणी सिग्नल पाठवण्यात आला होता. हा सिग्नल पाठवल्याच्या दोन दिवस आधी(10 जुलै 1962) अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या फ्लोरिडा येथील केप केनरवेल येथून जगातील पहिला खासगी स्वरूपात प्रायोजित केलेला पहिला उपग्रह टेलस्टार लॉँच केला. हा उपग्रह बेल टेलिफोन लॅबोरेटरीजने तयार केला होता. टेलस्टार जगातील दळणवळण क्षेत्रातील पहिला यशस्वी उपग्रह ठरला होता. याच्या माध्यमातून व्यावसायिक पेलोड नेण्यात आले होते. टेलस्टारकडून टीव्ही सिग्नल फार थोड्या कालावधीसाठी पाठवण्यात आले, परंतु त्याचा उपयोग छायाचित्र घेण्यासाठी होऊ लागला. टेलस्टारचे पहिले छायाचित्र अमेरिकी अध्यक्ष जॉन एफ केनडी आणि फ्रान्सचे प्रसिद्ध गायक यीव्स मोंता यांचे होते.
भारतातील दूरचित्रवाणीची प्रगती
भारतात 1972 मध्ये मुंबई आणि अमृतसरमध्ये दूरचित्रवाणी सेवेचा विस्तार झाला. 1975 पर्यंत केवळ पाच शहरांपर्यंत दूरचित्रवाणीचे
प्रसारण होते. 1976 मध्ये दूरचित्रवाणी नभोवाणीपासून विभक्त करण्यात आली. 1982 मध्ये राष्ट्रीय प्रसारण सुरू झाले.
चांद्रमोहिमेला पंख फुटले- अमेरिकी अध्यक्ष केनडी यांनी 1961 मध्ये चंद्रावर मानवी पाऊल ठेवण्याबाबतचे वक्तव्य केले होते. 1962 मध्ये दळण वळण उपग्रहाच्या यशस्वितेनंतर अंतराळाचे द्वार उघडले. 1961-72 पर्यंत नासाची अपोलो मोहीम सुरू होती. यामध्ये 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 मध्ये नील आर्मस्ट्रांग, एडविन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिंग्स यांनी चंद्रावर पाऊल ठेवले.
छतावर लागलेल्या अ‍ॅँटिनापासून डीटीएचपर्यंत
अ‍ॅँटिना आवश्यक होता- 1980 च्या दशकामध्ये टीव्ही सुरू करण्यासाठी घराच्या छतावर अ‍ॅँटिना लावणे आवश्यक होते.
सेट टॉप बॉक्स- 2000 च्या दशकामध्ये वाहिन्यांच्या डिजिटलायजेशनसाठी सेट टॉप बॉक्स आवश्यक ठरले.
केबल क्रांती- 1990 च्या दशकात खासगी वाहिन्यांच्या आगमनामुळे घराघरात केबल जोडण्या दिसू लागल्या.
डीटीएचचा काळ- 2010 च्या दशकात सॅटेलाइटमार्फत थेट घरापर्यंत वाहिनी पोहोचू लागली.
40- कोटी दर्शकांपर्यंत पोहोचला भारत
500- हून अधिक वाहिन्या प्रसारित होत आहेत.