आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षांनंतर जुळ्या भावांना इच्छामरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ब्रुसेल्स - बेल्जियममध्ये जन्मलेल्या मूकबधिर जुळे भाऊ मार्क आणि एडी वर्बोसम यांना 45 वर्षे खडतर आयुष्य जगल्यानंतर इच्छामरण मिळाले आहे. आनुवंशिक आजारपणामुळे त्यांची दृष्टीही कमी होत होती. रोजचा दिवस घालवण्यासाठी दोघांना झगडावे लागत होते.

दोघे खाणाखुणा करून संवाद साधत होते. एकत्र राहत असलेल्या मार्क आणि एडीची कायमचीच दृष्टी जाईल, असे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे इच्छामरणाची परवानगी मागितली यूजे ब्रुसेल्स प्रवक्त्याने सांगितले की, दोघे मूकबधिर आणि दृष्टिहीन होते म्हणून नव्हे तर एकमेकांना पाहू शकत नव्हते तसेच ते एकमेकांशी संवाद साधू शकत नव्हते, परिणामी त्यांना इच्छामरण देण्यात आले. युरोपीय देशांमध्ये स्वीडनव्यतिरिक्त बेल्जियम या एकमेव देशात इच्छामरणाला कायदेशीर परवानगी आहे