आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Decided To Burn Jordan Pilot After Twitter Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॉर्डनच्या वैमानिकासाठी एक आई आर्जव करत होती तर दुसरी झाली होती क्रूर जल्लाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्डनचा वैमानिक मुआद अल कस्साबेह याला पकडल्यानंतर ISIS ने त्याला कसे ठार मारावे यासंदर्भात ट्विटरवर एक कॅम्पेन चालवले होते. त्यात समर्थकांना त्याला ठार मारण्याची पद्धत विचारण्यात आली होती. यावर तब्बल 1,000 समर्थकांनी प्रतिसाद नोंदवला होता. बहुतांश समर्थकांनी त्याला जाळून ठार मारण्याचा किंवा त्यावर बुलडोझर चालवण्याचा सल्ला दिला होता. एका आईने तर लोखंडी पोलने त्याला भोसकण्याचा सल्ला दिला होता. पोलने भोसकल्यास त्याचा बऱ्याच वेळाने तडफडून मृत्यू होईल, असे तिने सांगितले होते.
25 डिसेंबरपासून ISIS ने ट्विटरवर हे अभियान राबवले होते. त्याला हॅशटॅगही देण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देणाऱ्या काही समर्थकांनी जाळून ठार मारण्याचा तर काहींनी त्यावर बुलडोझर चालवण्याचा सल्ला दिला होता. प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये एक आईही होती. त्याने म्हटले होते, की त्याला गोळ्या घालून किंवा चाकूने शीर कापून मारले तर जास्त त्रास होणार नाही. लगेच मृत्यू होईल. त्याला लोखंडी पोलने भोसकून ठार मारायला हवे. यामुळे त्याचा लगेच मृत्यू होणार नाही. तो मृत्यूसाठी तडफडत राहिल. या महिलेने चक्क स्वतःचा व्हिडिओ तयार करुन हा सल्ला दिला आहे. या महिलेलाही मुले आहेत.
समर्थकांकडून आलेल्या पर्यायांवर विचार करुन जॉर्डनच्या वैमानिकाला प्रथम जाळून ठार मारण्यात आले. यासाठी त्याला एका पिंजऱ्यात कोंडण्यात आले होते. आग लावल्यावर त्याचा तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर त्या पिंजऱ्यावर बुलडोझर चालवण्यात आला. याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर ISIS च्या अकाऊंटवर हे रेकॉर्डिंग जगजाहीर करण्यात आले. हे रेकॉर्डिंग बघितल्यावर जगभरातील लोकांना या दहशतवादी संघटनेच्या क्रूरतेचा पुन्हा एकदा परिचय झाला.
पुढील स्लाईडवर बघा, ISIS च्या दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या वैमानिकाला कसे ठार मारले यांचे फोटो.... शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ....