आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरचे खास युजर नेम गेले चोरी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - ट्विटरवरील @ N हे खास युजर नेम हॅकर्सनी चोरले असल्याचा दावा कॅलिफोर्नियातील एका सॉफ्टवेअर डेव्हलपरने केला आहे. नेओकी हिरोशिमा ट्विटरवर @ N हे युजर नेम 2007 पासून वापरत होते.
नेओकी यांच्या मते, एका हॅकरला त्यांच्या गोडॅडी अकाउंटपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला आणि त्याने त्याच्यावरही नियंत्रण मिळवले. गोडॅडी एक डोमेन नोंदणी सेवा आहे. या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी हॅकरने अकाउंटची सेटिंग बदलली आणि मग वैयक्तिक इमेलपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. त्यानंतर हॅकरने नेओकी यांना मेल पाठवून त्यांच्या क्रेडिट कार्डच्या शेवटच्या चार डिजिटची माहिती मिळवून गोडॅडी खात्यापर्यंत पोहोचल्याची माहितीही दिली.
पेपालशी संपर्कातून यश
नेओकी यांचे खाते असलेल्या पेपालशी हॅकरने संपर्क साधला. त्याने स्वत:ला एक कर्मचारी दाखवले. क्रेडिट कार्डच्या शेवटच्या चार डिजिटची माहिती मिळवण्यासाठी त्याने अभियांत्रिकीच्या काही सोप्या युक्त्या वापरल्या. पेपालने मात्र कोणालाही खासगी माहिती दिल्याचे अमान्य केले आहे.
सोशल इंजिनिअरिंगचा वापर
आपल्या एका कर्मचा-याने ‘सोशल इंजिनिअरिंग’मुळे हॅकरला नेओकी यांचा तपशील उपलब्ध करून दिला, असे गोडॅडीने मान्य केले आहे. सोशल इंजिनिअरिंग ही अत्यंत खासगी माहिती हस्तगत करून एखाद्याचा सायबर छळ करण्याची पद्धत आहे. ज्या वेळी हॅकरने गोडॅडीशी संपर्क साधला तेव्हा त्याच्याकडे ग्राहकाच्या अकाउंटपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक माहिती होती.
50,000 डॉलरला विक्रीला काढले पण..
नेओकी यांनी हे युजर नेम 50 हजार डॉलरमध्ये विक्रीला काढले होते. विक्रीबाबत त्यांची बोलणी सुरू होती पण अंतिम सौदा होण्याच्या आतच हे युजर नेम ‘चोरी’ला गेले.
आणि युजर नेमवर पाणी सोडले : नेओकीकडे हॅकरने डेटा आणि वेबसाइट मिळून वापरण्याचा प्रस्ताव ठेवला. पण नेओकी यांनी या ट्विटर अकाउंटवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.