आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमधील दोन बुद्ध विहार बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चिनी नववर्षाचा विधी पार पाडण्यासाठी ‘तोतया भिक्खू’ आणल्याबद्दल आणि विधीसाठी लोकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केल्याच्या आरोपाखाली सहा लोकांना अटक करण्यात आली असून उत्तर चीनमधील पवित्र बुद्ध पर्वतावरील दोन मंदिरे बंद करण्यात आली आहेत.

वुटाई बुद्ध पर्वतावरील ‘फोगुआझोंजिन’ व ‘गॉड ऑ फ वेल्थ’ या दोन अनधिकृत मंदिरांनी गुरुवारी पर्यटक व भाविकांना गंडवण्यासाठी ‘तोतया भिक्खू’ आणले आणि नववर्षाच्या विधीसाठी भाविकांकडून प्रचंड पैसे उकळले, असे झिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. वुटाई पर्वत प्रशासनाच्या अधिका-यांनी शुक्रवारी ही दोन्ही मंदिरे बंद केली आणि त्याचे परवानेही रद्द करून टाकले. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. वुटाई बुद्ध पर्वतावर पर्यटकांची लूट होऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेऊ, असे प्रशासनाने म्हटले आहे. चिनी नववर्षाच्या सुटीच्या काळात या मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. वुटाई बुद्ध पर्वत हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले असून पर्वतावर 50 बुद्ध विहार आहेत.