इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या टेम्पामध्ये राहणा-या जस्टिन अर्नाल्डने आपल्या
फेसबुकवर दोन तोंड असलेल्या मगरीचे फोटो पोस्ट केले आहे. आपल्या कुत्र्याबरोबर फिरताना अर्नाल्ड यांना हिल्सबोरो नदीवर लोकांची गर्दी दिसली. काय झाले हे पाहाण्यासाठी गेले असता त्यांना दिसलेल्या दृश्यांनी ते आश्चर्यचकित झाले. किना-यावर दोन तोंडाचे मगर होते. मोनोजॉयगोटिक ट्विन्समध्ये शरीरापासून वेगळे होण्याची प्रक्रिय न झाल्याने मगरीची अशी स्थिती निर्माण झाली आहे, असे फ्लोरिडा फिश अँड गेम विभागचे म्हणणे आहे.
सरपटणा-या जीवांमध्ये असा प्रकार सतत घडत असतो. दोन तोंडाच्या मगरीचे फोटो फेसबुकवर जस्टिनने पोस्ट केले असून लोकांनी जास्तीत-जास्त ते शेअर करावे असे आवाहन केले आहे. आतापर्यंत 4 हजार 500 पेक्षा जास्त लोकांनी फोटो पाहिले आहे. पूर्वीही दोन तोंडाचे साप, कासव आणि सरपटणा-या प्रजाती पाहाण्यात आल्या आहेत. पण ते दुर्मिळ असतात.
पुढे पाहा.... इतर छायाचित्रे.....