आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यास काय म्हणावे? दोन प्रियकर ‘शेअर’ करणार पत्नी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुजा - प्रेमिकेने दोन प्रेमींमधून एकाची निवड करण्यास नकार दिल्याने केनियातील दोन प्रेमींनी अनोखी तडजोड केली आहे. त्यानुसार हे दोघेही आता पत्नी शेअर करणार आहेत. म्हणजेच दोघेही एकाच स्त्रीबरोबर विवाह करतील.
सिल्व्हेस्टर म्वेंद्वा आणि एलिजा किमानी अशी त्या दोघांची नावे आहेत. मोबासा प्रदेशातील या प्रेमवीरांना दोघांचेही चार वर्षांपासून एकाच स्त्रीशी अफेअर सुरू असल्याचे समजले. त्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांनी या अनोख्या करारावर सह्या केल्या. विशेष म्हणजे ही स्त्री विधवा असून तिला दोन जुळे मुलेही आहेत. या करारानुसार त्या दोघांना त्या महिलेसोबत मुलांसह संसार करावा लागेल. तसेच त्यांना एकमेकांबद्दलही आदर ठेवावा लागेल असे करारात नमूद आहे. हे तिघेही 25 ते 31 या वयोगटातील आहेत. या दोघां तरुणांमध्ये सुरू असलेल्या भांडण अदलाह नावाच्या व्यक्तीस प्रकरण समजले होते. मी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो, पण त्या दोघांनाही तिच्याबरोबर राहायचे होते, असे अदलाह यांनी सांगितले.


त्यावर त्यांनी त्या महिलेस एकाची निवड करण्यास सांगितले. मात्र, तिनेही दोघांपैकी एकाची निवड करणे शक्य नसल्याचे उत्तर दिले. या स्त्रीबरोबर विवाह करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊन परंपरेनुसार त्यासाठीची रक्कमही दिल्याचा दावा दोघांनी केला.


अजब प्रेम की गजब कहानी
० एकाच महिलेवर दोघांचे प्रेम
० तिलाही एकाची निवड झाली अशक्य
० विवाहासाठी तिघांचा अजब करार


पॉलिअँड्री
केनियामध्ये एकापेक्षा अधिक पत्नी असणे ही साधारण बाब असून अनेक समाज त्याचा अवलंब करतात. त्याला पॉलिगमी म्हणतात. पण एकाच स्त्रीने दोन जणांशी विवाह करण्याचे (पॉलिअँड्री) हे प्रकरण अजब आहे.


न्यायालयात सिद्ध करावे लागणार
आता या दोन्ही प्रेमवीरांना त्यांच्या समाजामध्ये एकाच स्त्रीबरोबर दोघांनी विवाह करण्याची प्रथा असल्याचे सिद्ध करावे लागणार असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. तर हा प्रकार कायद्याने पूर्णपणे अमान्यही केलेला नसल्याचे दुस-या एका वकिलाने म्हटले आहे. कायद्यातील अस्पष्ट बाबींमुळे या दोघांच्या समाजांमध्ये कशा प्रकारच्या प्रथा आहेत, यावर या विवाहाबाबत निर्णय होणार आहे.