आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Other Military Jets On Mh17 Course Before Crash

दुर्घटनेपूर्वी मलेशियाच्या एमएच 17 विमानबरोबर दोन फायटर जेटही उडत होते, नवा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : एमएच 17 विमानाचे अवशेष.
कीवी - मलेशिया एअरलाइन्स विमान एमएच 17 च्या दुर्घटना प्रकरणाचा नवा खुलासा समोर आला आहे. रशियन एअर सेफ्टी कन्सल्टन्सीने नवा रडार डाटा प्रसिध्‍द केला आहे. ज्यात दुर्घटनेपूर्वी विमानाबरोबर लष्‍करी विमानही बरोबर उडत होती. याचा पुरावा म्हणून रशियाच्या रोस्तोव रडार स्टेशनच्या डाटाचे स्क्रीनशॉट प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. हे रडार स्टेशन दुर्घटनास्थळापासून म्हणजे युक्रेनच्या सीमेवर होते. त्यात एमएच 17 दुर्घटना होण्‍यापूर्वी 20 मिनिटांचा डाटा रेकॉर्ड झाला होता.एव्हिएशन सेफ्टी कन्सल्टन्सीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सर्गे मेलनिचेन्कोने सांगितले की, दुर्घटना होण्‍यापूर्वी मलेशियन एअरलाइन्सबरोबर दोन फायटर जेट्स उडत होते.

एमएच 17 च्या दुर्घटनेची माहिती रोस्तोव एअर ट्रॅफ‍िक कंट्रोल सेंटरकडून मिळाली आहे, असे कन्सल्टन्सीने रशियाच्या वृत्तपत्राला सांगितले. मात्र या फायटर जेट्सची अधिक माहिती देण्‍यास नकार दिला.डाटाने स्पष्‍ट होते, की दुर्घटनेपूर्वी एमएच 17 बरोबर दोन इतर विमाने होती. दोन्ही एक-दूस-यापासून काही अंतरावर होती. यामुळे ती लष्‍करी विमाने असू शकतात, असे मेलनिचेन्को यांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे.

17 जुलै 2014 रोजी अॅमस्टरडॅमहून क्वाललम्पूरकडे निघालेले मलेशिया एअरलाइन्स एमएच17 चे रशिया-युक्रेनच्या सीमेवर कोसळले होते. यास बक मिसाइलने उडवले गेले असल्याचा दावा युक्रेन आणि पाश्‍चात्त्य देशांनी केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा रडार डाटाचा स्क्रीनशॉट