आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Police Died In Terrorist Attack At Keniyan Boarder

केनियन सीमेवरील दहशतवादी हल्ल्यात 2 पोलिस ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैरोबी - मॉलवरील हल्ल्यामुळे जगाला हादरा देणा-या दहशतवादी गट अल-शबाबने गुरुवारी केनियाच्या सीमेवरील शहरात हल्ला केला. सुरक्षा छावणीवरील हल्ल्यात दोन पोलिस अधिकारी ठार झाले. अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी वजीर या शहरात हा हल्ला केला. त्यात तीन पोलिस जखमी झाले तर 11 वाहनांचे नुकसान झाले.

वेस्टगेट मॉलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेथे चार दिवस ओलिस नाट्य घडले होते. त्यात 67 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या पार्श्वभूमीवर अल-शबाबने गुरुवारी सीमेवरील शहराला लक्ष्य करण्याची ही दुसरी वेळ आहे. सोमालियात केनियन लष्कर ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर रक्तपाताच्या घटनेसाठी तयार राहण्याची धमकी अल-शबाबकडून बुधवारीच देण्यात आली होती.