दरम्यान, अधिक-यांनी मात्र या मुली घरी परतणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. या मुलींपैकी एकीची हत्या झाली असल्याचे वृत्त आहे, पण त्याला दुजोरा मिळालेला नाही. या दोघी एप्रिल महिन्यात सिरियाला गेल्या होत्या. त्यांना ISIS च्या पोस्टर गर्ल्स म्हणून सादर करण्यात आले होते.
प्रेग्नेंट झाल्याने घरी जाण्याची इच्छा
या दोघी ऑस्ट्रियाच्या असून, सामरा केसिनोविच 17 तर सबीना सेलिमोविच 15 वर्षाची आहे. या दोघी ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्नामध्येच वाढल्या आहेत. दोघींनी घर सोडताना
आपण अल्लाहच्या कामासाठी जात असल्याचे पत्र लिहून ठेवले होते. सिरियाला गेल्यानंतर त्यांनी ISIS च्या दहशतवाद्यांबरोबर लग्न केले होते. त्यानंतर त्या गर्भवती झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी पालकांशी संपर्क करून घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.
बनल्या होत्या पोस्टर गर्ल्स
सामरा आणि सबीना ISIS च्या पोस्टर गर्ल्स बनल्या होत्या. दोघी बंदुका आणि शस्त्र घेऊन दहशतवाद्यांबरोबर त्यांची छायाचित्रे पोस्ट करायच्या. त्यांचा भरपूर प्रचारही केला जायचा. मात्र पोलिसांच्या मते, दहशतवाद्यांनी मुलींचे अकाऊंट त्यांच्या ताब्यात घेतले होते व ते हवे ते पोस्ट करायचे. ते या मुलींच्या जीवनशैलीचा उल्लेख करून इतर मुलींना सिरियाला येण्यासाठी प्रलोभने दाखवतात.