Home | International | China | two-students-death

दोन शालेय विद्यार्थ्यांचा बसमध्ये गुदमरून मृत्यू

वृत्तसंस्था | Update - Sep 07, 2011, 05:02 AM IST

अनवधानाने शाळेच्या बसमध्ये राहिलेल्या दोन शालेय मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली.

  • two-students-death

    बिजिंग - अनवधानाने शाळेच्या बसमध्ये राहिलेल्या दोन शालेय मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना चीनमध्ये घडली. अवघ्या तीन वर्षांची ही मुले कित्येक तास त्या बसमध्येच अडकली होती.
    हैनन प्रांतातील सान्या शहरातील बालविहारमध्ये ही घटना 29 आॅगस्ट रोजी घडली. सर्व बाजूंनी बंद बसमध्ये सुमारे सात तास हा मुलगा होता. दरवाजा बंद करण्यापूर्वी दोनवेळा खात्री करून घेण्यात शिक्षकांकडून दुर्लक्ष झाल्याने या चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या तीन दिवसांनंतर पाच वर्षीय मुलगी एका अन्य घटनेत अशाच परिस्थितीत मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही घटना हैकोऊमधील एशिन बालविवारमध्ये घडली. एकाच आठवड्याच्या कालावधीत या घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Trending