आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Top American Bankers Commit Suicide In London

अमेरिकेच्या दोन बॅंक अधिकार्‍यांचा संशयास्पद मृत्यु, स्लिम यांच्या मृत्युचे वाढले गूढ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अमेरिकेच्या दोन वरिष्ठ बॅंक अधिकार्‍यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याचे उघडकीस आले आहे. जेपी मॉर्गन बॅंकेचे व्यवस्थापक गेब्रियल मेगी यांनी 500 फूट उंच इमारतीवरून उडी घेवून आत्महत्या केल्याचे समजते. दुसरीकडे, विलिवम बिल ब्रोकस्मिथ यांनी साउथ केंगिस्टनमध्ये राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. दोन्ही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या या संशयास्पद मृत्युमुळे खळबळ माजली आहे.

दरम्यान, 'टाटा मोटर्स'चे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांच्या मृत्युचे गूढ वाढले आहे. बॅंकॉकमधील 'शांगरी ला' हॉटेलच्या 22 व्या मजल्यावरून पडून स्मिम यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता.
गेब्रियर मेगी हे जेपी मॉर्गन बॅंकेचे कॉर्पोरेट आणि इंव्हेस्टमेंट विभागाचे उपाध्यक्ष होते. मेगी यांचा मृतदेह नवव्या मजल्यावर आढळून आला होता. मेगी यांनी 2004 साली आपल्या पदाची सुत्रे स्विकारली होती. 2007 साली मेगी यांना अमेरिकेतून ब्रिटनला पाठवण्यात आले होते. उल्लेखनिय म्हणजे मेगी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी बॅंकेतील सर्व सहकार्‍यांना एका ई-मेलही पाठयला होता.
जेपी मॉर्गन बॅंकेच्या प्रवक्यांनी मेगी यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मेगी यांचा मृत्यु संशयास्पद वाटत असला तरी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे मेट्रोपोलिटन पोलिस सुत्रांनी सांगितले आहे. मेगी यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
यापूर्वी, लंडनमधील डच बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक ब्रोकस्मिथ यांनी गेल्या रविवारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. ब्रोकस्मिथ अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 2008 साली आलेल्या आर्थिक मंदीतून बॅंकेला बाहेर काढण्यासाठी ब्रोकस्मिथ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'टाटा'चे संचालक कार्ल स्लिम यांच्या मृत्युचे वाढले गुढ...