आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकेल्या सिंहांनी जगातील उंच अशा प्राण्‍याची केली शिकार, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - भूकेल्या सिंहांसमोर कोणाचेही काही चालत नाही. जगातील उंच अशा जीवाचा करूण अंत होतोच. वयस्क ज‍िराफवर भूकेले सिंह तुटून पडले असे तुम्हाला छायाचित्रांमध्‍ये दिसत आहे. पण जिराफची शिकार करण्‍यासही सिंहांना खूप मेहनत घ्यावी लागली. वर दिसणारे हे दृश्‍य आहे आग्नेय नामिबियातील इटोशा नॅशनल पार्कमधील. जिराफला आपल्या नियंत्रणात आणण्‍यासाठी तरूण सिंहांना अक्षरशः घाम गाळावा लागला.
तब्बल रात्रभर चाललेल्या संघर्षात जिराफ पराभूत झाला. ही क्षणचित्रे कॅमे-यात कैद केली आहेत दक्षिण आफ्रिकेचा छायाचिकार मॉर्केल इरासमस याने. जिराफने स्वत:चा जीव वाचवण्‍यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. आपण पराभूत होणार असे लक्षात आल्यावर त्याने सिंहांपुढे गुडघे टेकले, असे इरासमस यांनी सांगितले.
पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा सिंहांनी कसे जिराफाची शिकार केली....