मनिला- फिलिपाइन्समध्ये आलेल्या हागूपीट सागरी वादळाचा पूर्व भागाला जोरदार तडाखा बसला आहे. समर, बोरोनगन आणि मनिलामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मनिलामध्ये अनेक तास वीज खंडित झाली होती.
85 किमी प्रतितास वेगातील वा-यामुळे बतनगस प्रांत आणि मनिलामध्ये अनेक भागांत वीज गुल झाली असून दूरध्वनी जोडण्या तुटल्या आहेत. साधारण हजार कर्मचारी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. 24 तास वादळाची तीव्रता राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. समर राज्याच्या बोरोनगन भागात वादळामुळे उद्ध्वस्त शाळा ढिगा-यात रूपांतरित झाली आहे.याच राज्यातील मनतांग भागातील शेकडो घरांची छते उडून गेली असून वृक्ष उन्मळून पडली आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा उद्धवस्त झालेल्या घरांची फोटो...