आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग उन यांनी 30 मार्चला दिलेल्या धमकीत दक्षिण कोरियासोबत आमची युद्धाची मानसिकता असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर कोणत्याही हल्ल्यासाठी आमची सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. उकसवण्याचा प्रयत्न केला तर पूर्वसूचना न देता हल्ला करू, असा इशारा सोमवारी दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षा पार्क गुन यांनी उत्तर कोरियाला दिला. या काळात अमेरिकेने द. कोरियात सुरू असलेल्या लष्करी सरावात स्टिल्थ लढाऊ विमान एफ-22 तैनात केले आहेत. जर उन यांनी इशारा दिला तर युद्ध अटळ आहे. दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया, चीन व पोप फ्रान्सिस यांनी उभय देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
1953 पासून युद्धाच्या उंबरठ्यावर
दोन्ही कोरियामध्ये आतापर्यंत केवळ एकदाच 1953 मध्ये युद्ध झाले होते, त्या वेळी शस्त्रसंधी आणि शांती करारावर सहमती झाली होती. परंतु हा करार होऊ शकला नव्हता. त्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. 2010 मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या नौदलाच्या जहाजावर हल्ला केला आहे.
कोणता देश कोणासोबत ?
उत्तर कोरिया
चीन, रशिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, पाकिस्तान, जपान. रशिया आणि जपान प्रत्यक्षपणे सोबत नाहीत, परंतु संरक्षण, वाणिज्य प्रकरणात हस्तक्षेप करू शकतात.
दक्षिण कोरिया
अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अर्जेंटिना, न्यूझीलंड, युरोपियन संघटना. भारताने कोरियातील युद्धाच्या काळात अमेरिकी सैनिकांच्या मदतीला मेडिकल स्टाफ पाठवला होता.
आपण कोणासोबत ?
@2010-11 मध्ये 3 हजार 104 कोटी रुपयांचा वाणिज्यविषयक सौदे झाले होते. भारताने द.कोरियाच्या बाजूने राहताना उत्तर कोरियाला विरोध केला .
@ संरक्षण, व्यापार,
इलेक्ट्रॉनिक आणि विज्ञान क्षेत्रात 2015 पर्यंत दोन्ही देशांत 2.17 लाख कोटी रुपयांच्या व्यापाराची शक्यता.
असा हेका याधीही
@ व्हिएतनाम युद्ध : 1955 ते 75 पर्यंत चाललेल्या युद्धात अमेरिका तोंडावर पडली होती. यानंतर उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम एकत्र आले.
@ इराक युद्ध : 2003 ते 2011 पर्यंत हे युद्ध दोन टप्प्यांत झाले. शेवटी अमेरिका व नाटो जवानांचा विजय झाला.
@ अफगाणिस्तान युद्ध : येथे दहशतवादी संघटना तालिबान मुख्य शत्रू आहे. 2001 पासून चकमक सुरू आहे. अमेरिका व नाटो जवानांचा येथे तळ आहे.
भास्कर तज्ज्ञ समिती
स्कंद तायल, द. कोरियातील भारताचे माजी राजदूत
उ. कोरिया उद्ध्वस्त होईल
युद्ध झाल्यास उ. कोरिया उद्ध्वस्त होईल. द.कोरियात संयुक्त लष्करी व्यवस्था आहे. अमेरिकेचे यावर नियंत्रण आहे. द.कोरियावरील हल्ला अमेरिका आपल्यावरील हल्ला समजेल.
अफसर करीम, लष्करी प्रकरणाचे तज्ज्ञ
तणावपूर्ण संबंध राहतील
उत्तर कोरियाच्या इशार्यामुळे संबंध तणावपूर्ण होतील, मात्र युद्ध होणार नाही. युद्ध झाल्यास चीनला सर्वाधिक नुकसान सोसावे लागेल. भारतावर थेट परिणाम होणार नाही.
रहीस सिंह, संरक्षणतज्ज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.