आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • UAE First Women Pilot Who Bombarded On ISIS Is \'disowned By Her Family\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS तळांवर UAEच्या पहिल्या महिला पायलटने केला बॉम्ब वर्षाव, कुटुंबाने तोडले नाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या ठिकाण्यांवर बॉम्ब वर्षाव करुन पोस्टर गर्ल बनलेल्या संयुक्त अरब अमिरातच्या पहिल्या महिला पायलट सोबत त्यांच्या कुटुंबाने कथितरित्या नातेसंबंध तोडले आहे. 35 वर्षीय मेजर मरियम अल मंसूरी यांच्या कुटुंबियांनी सुन्नी दहशतवाद्यांचे कौतूक करत स्वतःच्या मुलीला कृतघ्न म्हटले आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, मरियम यांच्या कुटुंबियांनी एक निवदेन जारी केले आहे. मात्र, ते खरोखर त्यांच्या कुटुंबियांनीच प्रसिद्ध केले की दुसर्‍या कोणी याला दुजोरा मिळालेला नाही. मरियमने गेल्या आठवड्यात लढाऊ विमान F-16 ने आयएसआयएसच्या ठिकाणांवर बॉम्ब वर्षाव केला होता. त्यानंतर पश्चिमी देशांमध्ये त्यांच्या कामगिरीचे मोठे स्वागत झाले होते.
मरियमच्या कुटुंबांचे निवदेन
महिला पायलट मेजर मरयिम यांच्या कुटुंबियांनी कथित रित्या एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, 'संयुक्त अरब अमिरात मधील आम्ही मंसुरी कुटुंबिय सार्वजनिकरित्या ही घोषणा करतो, की आमचा आमि मरियम अल-मंसुरी हिचा काही संबंध नाही, तिच्यासोबतचे नाते आम्ही तोडले आहे. तसेच, आमच्या मित्रासमान असलेल्या सीरियाच्या लोकांवर जे आंतरराष्ट्रीय अभियान राबवून हल्ला करत आहेत, त्यांच्याशीही आमचा संबंध नाही. देशवासियांना आमची विनंती आहे, की मरियम अल-मंसुरी जे काही करत आहे, त्याच्या परिणामांना आम्हाला जबाबदार धरू नये. सीरियाच्या लढाईमध्ये सहभागी असलेल्या लोकांना आमचे म्हणणे आहे, की त्यांनी एकजूट होऊन शैतान बशर अल-असदची सत्ता उलथवून लावावी. ज्या लोकांनी इस्मामिक स्टेट साठी हत्यार हातात घेतले आहे, त्यांचा आमच्या कुटुंबाला अभिमान वाटतो.'

कोण आहे मरियम
मरियमचा जन्म अबु धाबी येथे झाला. संयुक्त अरब अमिरातची ती पहिली महिला पायलट आहे. तिला सात बहिण भाऊ आहेत. लढाऊ विमान पायलट बननण्याचे श्रेय ती आई-वडिलांना देते. काही दिवसांपूर्वीच तिने म्हटले होते, की सुरवातीपासूनच मला लढाऊ पायलट बनण्याची इच्छा होती. मंसुरी यांचया आठ मुला-मुलींपैकी मरियमशिवाय इतर दोघेही देशसेवेत आहे. मरियमची बहिण आयेशा अल-मंसुरी A320 ऑफिसर आहे, तर तिचा भाऊ अलि अल-मंसुरी अबु धाबीच्या पोलिस विभागात हेलिकॉप्टर पायलट आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोस्टर गर्ल मरियमची छायाचित्र