आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • UAE Great Destination For Indians To Get Richer: Study

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीमंत होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीस अचूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आखाती देशांमध्ये जे भारतीय मजूर काम करत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे एका संशोधन पाहणीत दिसून आले आहे. भारतात राहणारे त्यांचे कुटुंबीय आर्थिकदृष्ट्या व जीवनमानाच्या दर्जाच्या बाबतीत वेगाने विकास करत असल्याचे यात दिसून आले. अमेरिकेतील ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटरने हे अध्ययन केले. यात भारतातील १० राज्यांमध्ये पाहणी करण्यात आली.

या मजुरांना भारतात मिळणार्‍या वेतनापेक्षा आखाती देशांत अडीच पट अधिक वेतन मिळते. वर्ष २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या वेळी व त्यापूर्वी अनेक भारतीयांना येथील बांधकाम व्यवसायात संधी मिळाली. सध्या अरब देशात काम करणार्‍या भारतीयांमुळे आर्थिक सक्षमता वाढली आहे. या देशात हजारो नोकर्‍या भारतीयांनी मिळवल्या आहेत. गेल्या वर्षात येथील कर्मचार्‍यांनी भारतात पाठवलेल्या वेतनात २५० ते ३०० % वाढ दिसून आली आहे. ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक मायकेल क्लेमेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली ८६ संशोधकांच्या गटाने आखाती देशातील भारतीय कर्मचार्‍यांच्या कामाचा व वेतनाचा डेटा संकलित केला.

अरब देशात काम करणारे भारतीय व तसेच काम करणारे भारतातील कर्मचारी यांच्या मिळकतीचा तुलनात्मक अभ्यास या संशोधक गटाने केला. हे संशोधन संयुक्त अरब अमिरातीजच्या श्रम मंत्रालयाच्या अल-अमल मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर नोकरीसाठी अर्ज करणार्‍यांना तुलनेने कमी संधी मिळाल्याचे यात संशोधनात दिसून आले.