आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uber Taxi App Shut Down In Spain; India Considering Ban After Rape Case

उबर कॅबची चालकसेवा स्पेनमध्ये रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - दिल्लीतील अत्याचार प्रकरणामुळे वादात सापडलेल्या उबर कॅबची चालकसेवा स्पेनमध्ये रद्द करण्यात आली आहे. स्पेन काेर्टाच्या आदेशानंतर वेब आधारित सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उबरपॉप ही सेवा अव्यावसायिक चालकांच्या माध्यमातून दिली जात होती. मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने स्वत:च्या मालकीच्या कारने प्रवासी सेवा देण्याचा यात समावेश होता. ही सेवा एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली होती. ही सेवा तूर्त रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले, असे उबरचे स्पेनमधील प्रमुख कार्लेास लॉरेट यांनी मंगळवारी उशिरा ब्लॉग लिहून कळवले.