फोटो: कैमरे में कैद हुई यूएफओ के जैसी वस्तु।
मेक्सिको - मेक्सिकोच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखी जवळ एक उडणा-या घोड्याच्या आकाराचे यूएफओ पाहण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मेक्सिको सिटीच्या पश्चिमेकडे 300 मैल लांब असलेल्या कोलिमा ज्वालामुखीजवळ पाहण्यात आलेल्या आकृतीला दोन पाय असल्याचे दिसले आहे. कोलिमा या आठवड्यात जागृत झाल्यानंतर वेबकॅममध्ये घोड्यासारख्या रहस्यमय आकृती कैद झाली आहे आणि ती काही क्षणात गायब होते.
या घटनेचे साक्षीदार 24 वर्षांचे लोयोला क्विनटॅनिला रोझास यांनी सांगितले, की जेव्हा मी त्या आकृतीला पाहिले, तेव्हा ते घोड्याप्रमाणे दिसले. त्याचे शरीर धिप्पाड होते. वरच्या बाजूने बारीक आणि मधला भाग फुगलेला होता. खालचा भाग दोन भागात विभागला होता. परंतु त्याचे पाय हालचाल करत नव्हते.लोयोला वाटते की ते एलियनचे विमान असू शकते.
पृथ्वीवरुन काही नमूने घेऊन गेले
एलियनचे अस्तित्व मानणारे 35 वर्षांचे एफरासियो गोंझालिस सांगतात,की ज्वालामुखीच्या चारीही बाजूने काही हालचाली चालू आहेत. पण आताच्या घटनेने त्यास आणखी रहस्यमयी बनवले आहे. त्यांनी (एलियन)
आपल्या पृथ्वीवरील काही नमूने घेऊन गेले असतील, असे गोंझालिस यांनी वाटते. तेथे एक प्रकारचे ड्रोन असू शकते, असे मेक्सिकोचे सरकारचे प्रवक्त्याने म्हटले आहे. सध्या याबाबत तपास चालू आहे.
पुढे पाहा ज्वालामुखीजवळ असलेल्या कॅमे-याने कैद केले युएफओसारख्या वस्तूचे छायाचित्रे...