आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सगळ्यात विद्रूप आणि घाणेरडे प्राणी; छायाचित्र पाहिले तरी येते किळस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या पाठीवर लहान-मोठे असे लाखों प्राणी विहार करतात. काही प्राणी दिसायला इतके सुंदर असतात, की लोक अक्षरश: त्यांच्या प्रेमात पडतात. परंतु काही प्राणी इतके घाणेरडे आणि विद्रूप दिसतात, की त्यांना पाहिल्यानंतर किळत येते. विशेष म्हणजे काही प्राणी इतके भयानक असतात, की त्यांचे छायाचित्र पाहूनच काहींच्या मनात धडकी भरते. त्यामुळे बहुतेक प्राणी आजही अप्ररिचितच आहेत. ते आजपर्यंत जगासमोर ही कधी आलेले नाहीत. मात्र समाजाने नाकारलेल्या अशा प्राण्यांना 'अ‍ॅनिमल प्रिजर्वेशन सोसायटी' या संस्थेने जवळ केले आहे. ही संस्था त्यांची काळजी घेते, त्यांना संरक्षण देते.

अ‍ॅनिमल प्रिजर्वेशन सोसायटी अशा प्राण्यांचा शोध घेऊन त्यांचे कॅम्पेन करते. स्टीफन फ्राय आणि सिमोन पेग हे या सोसायटीचे सर्व काम पाहतात. दोघेही अशा घाणेरडे, भयानक आणि विद्रूप प्राण्‍यांची काळजी घेतात.

येत्या 12 सप्टेंबर रोजी न्यूकेस्टलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्रिटिश सायन्स फेस्टिवलमध्ये अशा प्राण्यांवर एक स्पर्धा घेण्‍यात येणार आहे. या स्पर्धेत वोटर्स आपल्या आवडत्या प्राण्याची निवड करतील. सगळ्यात जास्त वोट्‍स ‍मिळालेल्या प्राण्याला सगळ्यात विद्रूप प्राण्याचा किताब (अगलिएस्ट अ‍ॅनिमल ऑफ दी किंगडम) दिला जाणार आहे.

सगळ्यात विद्रूप प्राणी पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...