आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UK Inspectors Investigate 'Islamist Takeover' At 15 Public Schools News In Divya Marathi

शाळांमधील इस्लामी कट्टरवादाविरुद्ध मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमधील सरकारी अनुदानित शाळांमध्ये वाढत चाललेल्या इस्लामी कट्टरवादाविरुद्ध मोहीम उघडण्यात आली असून शाळा निरीक्षकांची पथके यासाठी नेमण्यात आली आहेत. शिक्षणमंत्री मायकेल गोव्ह यांनी अशा शाळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बर्मिंगहॅममध्ये अशा कट्टरवादी शाळांची संख्या अधिक आहे. या भागात बहुतांश शाळांवर कट्टरवादी संघटनांनी एक प्रकारे ताबा मिळवला आहे. अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत असून या शाळांची कसून तपासणी करण्यात येत आहे. ब्रॅड फोर्ट व मॅँचेस्टरमध्येही असे प्रकार घडलेले आहेत.