आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UK Open To Sikh As Head Of Armed Forces, Judiciary: Cameron

ब्रिटनमध्ये शीख आता सैन्य, न्यायपालिकेतही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये एखाद्या शीख व्यक्तीला न्यायपालिका किंवा लष्करात प्रमुख पद बहाल केले जाऊ शकते. त्यात आम्हाला काहीच आक्षेप नाही, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी केली आहे. आपल्या सरकारी निवासस्थानी 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित बैसाखी उत्सवात शीख समुदायाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना कॅमेरून बोलत होते. या वेळी त्यांनी शीख समुदायाचे कौतुक केले. या समुदायातील लोक कठोर पर्शिम करणारे असून त्यामुळे प्रगती, विकासाला हातभार लागतो. त्यांनी मेहनती शिखांनी ब्रिटनच्या संसदेत येण्याचेही निमंत्रण दिले.

ब्रिटनमध्ये भारतीय शीख समुदायाची संख्या मोठी आहे. कॅमेरून पुढे म्हणाले की, ‘मेहनती शीख समुदायाचे सध्या जितके प्रतिनिधी ब्रिटनच्या संसदेत आहेत तितके पुरेसे नाहीत. शीख समुदाय आमच्या स्थानिक समुदायाची मिळून मिसळून काम करत असेल तर त्यातून एक चांगले आदर्श मॉडेल विकसित होईल. व्यवसाय असो वा लष्कर किंवा कोणतीही सरकारी नोकरी तेथे ते चांगलेच काम करतात.’ कॅमेरून यांनी त्यांच्या निवासस्थानी चौथ्यांदा बैसाखी उत्सव साजरा केला. ब्रिटनमध्ये 2015 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून यात शिखांचे मोठे मतदान आहे. ब्रिटनमध्ये 4.4 लाख शीख बांधव असून त्यापैकी 4.2 लाख शीख केवळ इंग्लंडमध्ये राहतात. पैकी अनेक जण राजकारणात सक्रिय आहेत.

अमेरिकेचे धार्मिक धोरण भेदभावपूर्ण
ब्रिटनमध्ये शिखांना सवलत मिळत असताना अमेरिकेतील 21 धार्मिक समुदायांनी मात्र पेंटागॉनने जाहीर केलेले नवे धार्मिक दिशानिर्देश भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लष्करातील सैनिकांवर अतिशय कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याबाबत त्यांनी संरक्षण मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली आहे. चांगले धर्मनिरपेक्ष वातावरण कायम राखण्यासाठी त्यात बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या निर्बंधानुसार शीख समुदायाला डोक्यावर पगडी घालता येणार नाही. केस कापावे लागतील तसेच दाढीही ठेवता येणार नाही. याला काही नियमांत अपवाद आहेत; परंतु त्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे नियम पाळावेच लागतात.