आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UK Queen Confers Knight Commander Rank On Ratan Tata

टाटा ब्रिटनचे ‘नाइट कमांडर’; महाराणींच्या हस्ते सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - टाटा समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांना ब्रिटनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते ‘नाइट कमांडर (केबीई)’ ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. महाराणींच्या वतीने दिला जाणारा हा सर्वोच्च बहुमान आहे. ब्रिटिश राजघराण्यानुसार भारत-ब्रिटनमध्ये व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने रतन टाटा यांचे योगदान मोलाचे आहे. सन 1907 पासून टाटा लिमिटेड ही कंपनी लंडनमध्ये कार्यरत असून या समूहाच्या वतीने ब्रिटिश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. या कंपनीने युरोपातील 60 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.