आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UK Queen Looking To Recruit Correspondence Officer

ब्रिटीश महाराणीला हवा पत्र लेखक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जमाना इ-मेल, टेक्स्टचा असला तरी ब्रिटनच्या महाराणी मात्र अजुनही पत्र व्यवहाराच्या दुनियेत आहेत. म्हणूनच त्या सध्या पत्र लेखनासाठी अधिकार्‍याचा शोध घेत आहेत. त्याला वर्षाकाठी पगार असेल सुमारे 17 लाख रुपये ! करेसपाँडन्स ऑफिसरची पात्रता एका ओळीत स्पष्ट करण्यात आली आहे. महाराणीला मोठय़ा संख्येने आलेल्या पत्रांचे कमीत कमी वेळेत वाचन आणि त्याचा अर्थ लक्षात घेण्याची क्षमता उमेदवारात हवी. सामान्य जनतेकडून येणार्‍या पत्र व्यवहाराला योग्य ते उत्तर देणे, इ-मेल्सला संवेदनशीलपणे हाताळण्याची कामेही त्या अधिकार्‍याला करावी लागतील. कामाचा कितीही ताण असला तरी अधिकार्‍याला शांतपणे आणि सातत्यपूर्ण काम करावे लागेल. तुम्हाला ज्या लेखन शैलीमध्ये योग्य वाटते, तिचा वापर या व्यवहारात केला जाऊ शकतो. तशी परवानगी रॉयल वेबसाईटवरून देण्यात आली आहे.