आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिव्ह/ ऐझवाल - युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेनमधील भारतीय राजदूत के. चंदर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. भारतीय लोकांनी युक्रेनमधील धोक्याच्या ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
युक्रेनमध्ये जवळपास 5000 भारतीय आहेत. यामध्ये बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतात. व्यवसायाशी संबंधित एक हजार लोक आहेत. आतापर्यंत कोणत्याही भारतीयाला या संघर्षाचा फटका बसला नाही. मात्र, रशियाच्या आक्रमक भूमिकेमुळे भारतीयांना युक्रेन सोडण्यास सांगितले जाऊ शकते.
दुसरीकडे मिझोरामचे मुख्यमंत्री लालथन हावला यांनी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद तसेच स्थलांतरित रहिवासी खात्याचे मंत्री वायलर रवी यांना पत्र लिहून युक्रेनमधील मिझोरामच्या विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. युक्रेनमध्ये मिझोरामचे 40 विद्यार्थी शिकत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.