आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ukraine Actress Nataliya Kozhenova Gets Obama Modi Tattoo On Her Back

PHOTOS : मोदी-ओबामांसाठी क्रेझी Actress, पाठीवर गोंदवला दोघांचा टॅटू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - अॅक्ट्रेस नटालिया कोझीनोव्हा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची जादू सर्वांनाच मोहीत करत आहे. ओबामांच्या भारत दौर्‍यामुळे भारतीयांबरोबरच यूक्रेनची एक अॅक्ट्रेसही भलतीच उत्साही होती. त्यामुळेच तिने टॉपलेस होत पाठिवर या दोन्ही नेत्यांचा टॅटू गोंदवून घेतला.

अॅक्ट्रेस आणि मॉडेल नटालिया कोझीनोव्हा हिने टॅटू हा टॅटू काढून घेत सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहेत. त्याआधीही तिने भारत आणि अमेरिकेच्या नात्यांबाबात सोशल मिडियावर अनेकदा उत्साही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोण आहे नटालिया
यूक्रेनची अभिनेत्री असलेली नटालिया कोझीनोव्हा भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या मैत्रीने भलतीच खुश आहे. ती भारतीय नसूनही तिला भारताबाबत आपुलकी आहे. मॉडेलिंग आणि काही चित्रपटांमध्ये अभिनय केलेली नटालिया अभिनेता अर्जुन रामपालची जबरदस्त फॅन आहे, तसेच त्याच्याबरोबर काम करण्याचीही तीची इच्छा आहे.

दरम्यान नटालिया याबाबत बोलताना म्हणाली की, मी भारतीय नाही आणि प्रसिद्धीसाठीही मी हे सर्व करत नाही. हे दोन्ही देश आणि विशेषतः हँडसम मिस्टर मोदी आणि प्रेसिडेंट ओबामा हे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत, त्यामुळे मी माझे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून हे करत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नटालियाचे काही Photo's...