आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलकांनीच पेटवल्या स्वत:च्या राहुट्या, 9 पोलिस अधिकार्‍यांसह 25 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किव- रशिया सर्मथक सरकारविरोधात सुरू झालेल्या युक्रेनमधील आंदोलनाचा मंगळवारी रात्री भडका उडाला. ऐतिहासिक इंडिपेंडन्स चौकात ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांना हुसकावण्यासाठी पोलिस जाताच निदर्शकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून सरकारी इमारत पेटवून दिली. तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या राहुट्या पेटवून दिल्या. या जाळपोळीत 25 जण ठार, तर 241 जखमी झाले. यामध्ये 9 पोलिस अधिकार्‍यांसह निदर्शक व एका पत्रकाराचा समावेश आहे.
20 हजार निदर्शकांना विरोधी पक्षनेते विताली क्लितश्को यांनी रात्रभर पोलिसांना रोखून धरा अशी चिथावणी दिली. अद्यापही 10 हजार निदर्शक इंडिपेंडन्स चौकात धरणे धरून आहेत.
लक्ष्मणरेषा ओलांडली
भयंकर हिंसाचार थांबण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोविच यांनी विरोधकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. काही अतिरेकी गट रक्तपातासाठी चिथावणी देत आहेत, त्यापासून दूर राहा, असा इशारा यानुकोविच यांनी विरोधकांना दिला आहे.

पुढील स्लाइडवर, आंदोलनाची आणखी छायाचित्रे