आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ukraine Far right Leader Muzychko Dies 'in Police Raid' News In Marathi

युक्रेनमध्ये विरोधक नेता गोळीबारात ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किव/हेग - युक्रेन संकटाने मंगळवारी आणखी गंभीर रुप धारण केले. या संघर्षामध्ये रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लारो यांनी आपले युक्रेनमधील समपदस्थ आंद्रीय देश्वित्सिया यांची हेगमध्ये भेट घेतली. यानंतर काही वेळाने युक्रेनचे राष्ट्रवादी नेते ओलेक्सांद्र मुजीश्को यांचा पश्चिम भागातील एक कॅफेमध्ये पोलिस गोळीबारात मृत्यू झाला.

मुजीश्को उजव्या विचारणीचे नेते होते. ते साशो बिली या नावाने लोकप्रिय होते. ुयुक्रेनच्या संसदेने देशाचे संरक्षणमंत्री इहोर तेन्युक यांना बडतर्फ केले आहे.

क्रिमिया आणि युक्रेनच्या लष्करी तळावर रशिया कब्जा करत असताना बघ्याची भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता.