आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांती वार्ता निष्‍फळ युक्रेनमध्ये पुन्हा उद्रेक;चकमकीत 60 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किव- युक्रेनमध्ये सरकार आणि विरोधी निदर्शकांमध्ये बुधवारी रात्री उशिरा चर्चा निष्फळ झाल्यानंतर पुन्हा हिंसाचार उसळला. यामध्ये गुरुवारी 60 जण ठार झाले. हिंसाचाराच्या नव्या घटनेनंतर राजधानी किव लष्करी छावणीत रूपांतरित झाली आहे.
शहरात 17 जणांना ठार करण्यात आले. येथील स्वातंत्र्य चौकातील कोजात्स्की हॉटेलबाहेर 10 मृतदेह गोळीबारात छिन्नविच्छिन्न आढळले. याच हॉटेलमध्ये परदेशातून आलेले पत्रकार थांबले आहेत. दरम्यान, अमेरिकेने युक्रेनच्या 20 अधिकार्‍यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. निदर्शकांविरुद्ध आदेश देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
त्याआधी गुरुवारी अमेरिकी राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी सरकारला संयम राखण्याचा इशारा देत अन्यथा, गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे. त्यांनी निदर्शकांनाही शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. हा वाद रशिया-अमेरिका नाही. युक्रेनला आर्थिक मदत हवी असेल तर त्यांनी आंतरराष्टÑीय नाणेनिधीशी संपर्क साधावा. रशियाने मदत करण्याची आवश्यकता नाही, असे ओबामा म्हणाले..