आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका पाकिस्तानची मदत कापून युक्रेनकडे वळवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - युक्रेनवर कोसळलेल्या संकटाचा थेट पाकिस्तानवर परिणाम होणार आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीपैकी एक कोटी डॉलर (सुमारे सहा हजार कोटी रुपये) एवढी रक्कम कमी करून युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून दीड अब्ज डॉलर (सुमारे नऊ हजार कोटी रुपये) मदत दिली जाणार होती.

युक्रेन सपोर्ट अ‍ॅक्ट एचआर 4278 ला अमेरिकेच्या परराष्ट्र संबंध समितीने मंगळवारी मंजुरी दिली. गेल्या आठवड्यात समितीचे अध्यक्ष अ‍ॅड रॉयस आणि मुख्य सदस्य एलियट एंगल यांनी हे बिल सादर केले होते.

पाकिस्तानला आतापर्यंत लुगरबर्मन बिला अंतर्गत मदत पुरवली जात होती. याच बिलाच्या निधीतून युक्रेनला मदत देण्याचा निर्णय झाल्याचे मुख्य सिनेट सदस्य एलन ग्रेसन यांनी सांगितले. हे बिल औपचारिकपणे एनहॅन्स्ड पार्टनरशिप विथ पाकिस्तान अ‍ॅक्ट 2009 म्हणून ओळखले जाते. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हकडे पाठवला जाणार आहे.