आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ukraine Parliament Removes Yanukovich, Who Flees Kiev In 'coup'

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे देशाबाहेर पलायन, राष्ट्राध्यक्ष भवनावर आंदोलकांचा कब्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव्ह - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यांकोविच यांनी शुक्रवारी आंदोलकांपुढे शरणागती पत्करली. यांकोविच यांनी अनेक घोषणा केल्या. परंतु त्याला नागरिकांनी दाद दिली नाही आणि आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष भवनावर कब्जा केला. परंतु तेथे आंदोलकांना कोणीही आढळून आले नाही. आंदोलकांनी यांकोविच यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली.
राष्ट्राध्यक्ष भवनात काही खोल्यांना टाळे दिसून आले. बाहेर सुरक्षा रक्षक होते. परंतु त्यांनी आंदोलकांना अजिबात अडवले नाही. उलट त्यांनी आंदोलकांचे स्वागतच केले. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. यांकोविच यांनी देश सोडून पलायन केल्याचे मानले जात आहे. त्यांनी देश सोडल्याचा दावा विरोधी पक्षनेते क्लित्शको यांनी केला.
नवीन निवडणूक डिसेंबरमध्ये नव्हे तर 25 मे रोजी व्हावी, संसदेने राष्ट्राध्यक्ष यांकोविच यांना पायउतार करावे अशा विरोधकांच्या मागण्या आहेत. विरोधी पक्षाने संसद अध्यक्षाची निवड देखील केली. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शनिवारी फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील अस्थैर्य तातडीने संपुष्टात यावे, असे मान्य केले.