आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ ग्रहावरच्या दगडांना सोन्यापेक्षाही जास्त भाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - गेल्या वर्षी जुलै महिन्यात मोरक्को येथे मंगळ ग्रहावरून उल्कापात झाला होता असे शास्त्रज्ञांनी सांगितले असून, 50 वर्षात प्रथमच थेट मंगळावरून उल्कापात झाला असून या उल्कापातामुळे पडलेले दगड आता सोन्यापेक्षाही अधिक भावाने विकले जात आहेत.मंगळावर झालेल्या आतापर्यंतच्या एकाही मोहिमेत एवढा अमूल्य साठा हाती लागला नव्हता. असे खगोलतज्ज्ञांचे मत आहे.
सरलेल्या वर्षात जुलै महिन्यात मोरक्कोतील फोमझगित भागात आकाशातून मंगळावरून नेत्रदीपक वर्षाव झाला होता. परंतु उल्कापात झाल्यानंतर त्याचा एकही दगड अथवा अवशेष आढळले नव्हते.डिसेंबर महिन्यात त्याचे काही दगड सापडले. पण हे मंगळावरील दगडच आहेत हे निश्चित होत नव्हते.ज्या लोकांनी हे अवशेष गोळा के ले त्यांनी हे तुकडे मंगळावरचेच असल्याचे दावे केले होते.अखेर अलीकडे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले.
कोट्यवधी वर्षांपूर्वीच टक्कर
कोट्यवधी वर्षांपूर्वीच एखादी अतिप्रचंड आकाराची वस्तू मंगळाला धडकली असावी. त्याचे तुकडे आकाशात विखुरले गेले असावेत.सौर उर्जा क्षेत्रातून भरकटत ते पृथ्वीच्या वातावरणात आले असावेत असेही काही शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यातीलच एखादा मोठा तुकडा निसटून पृथ्वीवर पडला आणि त्याचे पुन्हा छोटे तुकडे झाले.हे तुकडेही 15 पौंडाचे आहेत तर काही 2 पौंडाचे आहेत असे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले.
हे तुकडे मंगळग्रहावरचे आहेत किंवा नाही हे अधिकृतरीत्या सिद्ध होण्यापूर्वीच विविध संग्रहालये, विद्यापीठे एवढेच नव्हे तर अमेरिकी अंतराळ संस्था नासाच्या शास्त्रज्ञांनाही हे तुकडे अव्वाच्या सव्वा दरामध्ये विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे.या एका दगडाची किंमत सोन्याच्या दहापट जास्त भावात विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. उल्कापात तज्ज्ञ ख्रिस हर्ड यांच्या नेतृत्वाखालील समिती या दगडांचे परिक्षण करणार आहे.त्यांनाही यापैकी काही अवशेष खरेदी केले आहेत.ते मिश्किलपणे म्हणाले,मंगळावरून हे मोफत नमुने आले आहेत पण आपल्याला पाहिजे असेत तर
डीलरला पैसे मोजावे लागतात.आजतागायत मंगळावर अनेक मोहिमा झाल्या परंतु एवढा प्रचंड साठा हाती लागला नव्हता.त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना आहे.

1865
साली भारतातही मंगळावरून उल्कापात झाला होता.ही इतिहासातील दुसरी घटना होती.तत्पूर्वी सन 1815 मध्ये फ्रान्स, सन 1911 इजिप्त आणि 1962 साली नायजेरियात ही दुर्मिळ घटना घडली होती.दर 50 वर्षांनी मंगळग्रहावरून उल्कापात होतो असे शास्त्रज्ञांनी सांगितले.