आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- संयुक्त राष्ट्रसंघाने अमेरिकेला ड्रोन हल्ल्यावरुन इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या परवानगीविना अमेरिकेने ड्रोन हल्ले सुरु ठेवले आहेत. ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष दूताने स्पष्ट केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष दूत बेन इमर्सन यांनी नुकताच पाकिस्तानचा 3 दिवसीय दौरा पूर्ण केला. त्यावेळी त्यांना ड्रोन हल्ल्यांबाबत माहिती देण्यात आली. हल्ल्यांपूर्वी पाकिस्तानची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, असे इमर्सन यांना सांगण्यात आले. ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेटीव्ह जर्नालिझमच्या एका अहवालानुसार, 2004 पासून आतापर्यंत अमेरिकेने 365 ड्रोन हल्ले केले आहेत. त्यात सुमारे 3577 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 800 जण सर्वसामान्य नागरिक आहेत.
दरम्यान, उत्तर कोरियाने अमेरिकेवर सायबर हल्ल्याचा आरोप केला आहे. यामुळे देशातील इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियावरच अनेक वेळा सायबर हल्ला करण्याचे आरोप झाले आहेत. परंतु, आता याच देशाने आरोप केला आहे. हल्ल्यामुळे प्रसार माध्यमांच्या सेवेवरही परिणाम झाल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.