आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकाविरोधी प्रस्तावाला भारताने पाठिंबा देणे आवश्यक होते, म्हणाले पी. चिदंबरम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- श्रीलंकाविरोधी प्रस्तावाला भारताने पाठिंबा देणे आवश्यक होते, असे मत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. वांशिक युद्धादरम्यान घडलेल्या गुन्ह्यांचा आंतरराष्ट्रीय तपास करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात सादर करण्यात आलेल्या श्रीलंकाविरोधी प्रस्तावावरील मतदानापासून काल भारत दूर राहिला. यानंतर दुसऱ्याच दिवशी चिदंबरम यांनी वैयक्तिक मत व्यक्त करीत कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत श्रीलंकाविरोधी प्रस्तावावर मतदान करण्यापासून दूर राहण्याचा भारताने घेतलेला निर्णय अपेक्षित होता, असेही चिदंबरम यांनी सांगितले आहे. भारताच्या भूमीकेवर तामिळनाडूतील राजकीय पक्षांमध्ये संशयाचे वातावरण नव्हते, असेही ते म्हणाले आहेत.
प्रस्तावावर काल मतदान होण्यापूर्वी भारतीय प्रतिनिधीने सांगितले, "प्रस्तावाच्या माध्यमातून श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आले आहे." तीन दशकांपासून श्रीलंकेत सुरू असलेल्या वांशिक युद्धात श्रीलंकेच्या लष्कराने बळाचा वापर करीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले. त्यानंतर त्याच्या तपासातही कुचराई दाखविली, असे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून तपास करण्याचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव ठेवण्यात आला होता.