आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UN Special Rapporteur On Violence Against Women To Visit India

महिला अत्याचाराचा आढाव्यासाठी युनोच्या दूताचा भारत दौरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनेव्हा- भारतातील महिला अत्याचाराविषयी आढावा घेण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या विशेष दूत पुढील आठवड्यात भारताच्या दौ-यावर येत आहेत. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भारतातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला. मात्र, संयुक्त राष्ट्राच्या वतीने असा आढावा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मानवी हक्क परिषदेच्या विशेष दूत रशिदा मंजू (दक्षिण आफ्रिका ) येत्या 22 एप्रिल रोजी दहा दिवसांच्या भारताच्या दौ-यावर येत आहेत. जगभरात होणा-या महिला अत्याचारांमागील कारणे आणि परिणामांवर देखरेख करणा-या विभागाचे प्रमुखपद मंजू यांच्याकडे आहे. भारतीय दौ-यात त्या दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडूसह इतर भागाला भेट देणार आहेत. सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्थांशी त्या चर्चा करणार आहेत. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भारतातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. नुकत्याच झालेल्या जर्मनीच्या दौ-यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत चर्चेवेळी जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता.

कोण आहेत रशिदा मंजू ?
संयुक्त राष्ट्राच्या महिला अत्याचारविषयक विशेष दूत रशिदा मंजू या दक्षिण आफ्रिके च्या ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.केपटाऊन विद्यापीठात त्या पार्टटाइम प्रोफेसर असून त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या स्री-पुरुष समानता आयोगाच्या संसदीय आयुक्त होत्या. सन 2009 मध्ये त्यांची प्रथम विशेष दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.