बर्लिन - जर्मनीमधील लायपिज शहरातील संयुक्त राष्ट्राच्या कर्मचार्याचा इबोलामुळे मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकार्यांच्या माहितीनुसार 56 वर्षीय ही व्यक्ती पाच दिवसांपूर्वीच सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. गेल्या आठवड्यात अधिकार्यांनी रुग्णाला सुदानचा डॉक्टर असल्याचे सांगितले होते. तसेच तो पश्चिमी-अफ्रिकन देश लायबेरियाहून जर्मनीत आल्याचे म्हटले होते.
याआधी बुधवारी अमेरिकेत थॉमस एरिक डंकन नावाच्या व्यक्तीचा इबोलामुळे मृत्यू झाला होता. डंकन लायबेरियाहून टेक्सासला जाताना आजारी पडला होता.
पश्चिमी अफ्रिकेन देशांमध्ये इबोला व्हायरसमुळे मरणार्यांची संख्या आता 4000 हजारांवर गेली आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये इबोला संक्रमणाचे रुग्ण समोर आल्याने हा आजार वैश्विकरुप घेण्याची भीती व्यक्त होत आहे.
(संग्रहित छायाचित्र - इबोलामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेऊन जाताना कर्मचारी)