आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unconfirmed Reports Claim Ttp Chief Maulana Fazlullah Was Killed In An Air Attac

पेशावर हल्ला : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या फजलुल्लाहचा खात्मा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पेशावरमधील आर्मी स्कूलवर हल्ला करणार्‍या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेचा प्रमुख मौलाना फजलुल्लाह अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.'द नेशन'च्या वृत्तानुसार, फजलुल्लाहच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी पाकिस्तान संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात आली. मात्र, पाकिस्तान आर्मीने यावर भाष्य केलेले नाही.
'द नेशन'च्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर तालिबान कमांडर फजलुल्लाह पाकिस्तान एअरफोर्सच्या फायटर जेट्सने केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानात मारला गेला आहे. काही खासगी न्यूज चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानविरोधात संयुक्त कारवाई केली आहे. सुत्रांनी सांगितले, की दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर फजलुल्लाहला निशाणा बनवण्यात आले.
पेशावर हल्ल्यात 132 शाळकरी मुलांसह 145 जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अनेक भागात ऑपरेशन्स करण्यात आले. यात शेकडो दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

पुढील स्लाइडमध्ये, काय आहे तहरिक-ए-तालिबान